Google PlusTwitter

मी मोर्चा नेला नाही…मी संपही केला नाही

By on Dec 22, 2010 | 3 comments

Share On GoogleShare On FacebookShare On Twitter

मी मोर्चा नेला नाही…मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना,कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होऊनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे,मूळ-फांद्या जिथल्या तेथे, पावसाळ्यात हिरवा झालो,थंडीत झाडली पाने

पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही, कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा,तुटलेली एकच गुंडी, टकलावर अजूनी रूळते अदृश्य, लांबशी शेंडी

मी पंतोजींना भ्यालो,मी देवालाही भ्यालो, मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो

मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही, मी कांदा झालो नाही!आंबाही झालो नाही!

 

क्रेडिट्स: संदीप खरे आणि सलील कुलकर्णी
युट्यूब व्हिडिओतील: गिटार+गायक: बिग के.3 Comments

  1. Amrut Desh

    December 23, 2010

    Post a Reply

    very true, typical marathi manoos…(but I wish it was not true), though very good song. Do post your other songs on youtube here as well, good guitar.

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *